श्यामची आई

तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो.

आम्ही शाळेत गेलो; परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता; परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे

114 of 837