श्यामची आई

पळसाची पाने, कुडयाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्याण चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे!

'श्याम! तू पत्रावळ लावावयास शीक. नाही तर आज जेवावयास मिळणार नाही.' असे आईने मला बजावले.

145 of 837