श्यामची आई

लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही, वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की, गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची. गप्पागोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पध्दत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले; परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही.

147 of 837