'हो; केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही.' मी म्हटले.
'घाणेरडा नाहीस; परंतु सू सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते.' आई म्हणाली.
मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो.
'पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे; पण कशी छान लावतो पत्रावळ.' आई बोलत होती.
मी रागाने भराभर जेवत होतो, पत्रावळ कशीतरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला