वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही.'
'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले.
'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला,