श्यामची आई

'यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.'

त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली,

208 of 837