श्यामची आई

इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, 'आई! केवढा ग तारा होता!'

आई गंभीरच होती. ती म्हणाली, 'श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लौकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे, मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो वारा?'

'नाही हो आई! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल.

210 of 837