श्यामची आई

'का, रे बाजूला बसलास?' आईने विचारले.

'आई! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे!' मी म्हटले.

आई हसली व म्हणाली, 'अरे वेडया, सुतक नको हो धरावयाला.'

मी म्हटले, 'आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो, ते?'

आई म्हणाली, 'माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्या जवळ असणार्याी मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे; म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत. म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता! बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले!'

225 of 837