लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे. उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवील. नाहीतर भावोजींबरोबर जा. अरे उठल्याबसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्यामुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व अंबी, त्यासुध्दा शिकल्या पोहायला. तू बांगडया तरी भर! पण बांगडया भरणार्याे मुलींहून सुध्दा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत