श्यामची आई

आईला राग आला व ती म्हणाली, 'बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा-मीच येत्ये थांबा.' आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुसर्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली.

'तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला! बघू कसा येत नाही तो!'

मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. 'नको ग आई मारू! आई, आई मेलो!' मी ओरडू लागलो.

236 of 837