अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, 'काय?' आई म्हणाली, 'ती दह्याची कोंढी घे. आत दही आहे चाटून टाक. तुला आवडते ना?'
'मला नको जा, सकाळी मारमार मारिलेस आणि आता दही देतेस.' मी रडवेला होऊन म्हटले, 'हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोचलो, तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?'
आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना.