श्यामची आई

ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा!

श्रमात आत्मोध्दार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल, तो सुदिन. घरी दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये, असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा,

259 of 837