वेणूने हाक मारली. परंतु आई कोठे होती? ती विहिरीवर गेली होती, का गोठयात होती? ती अंथरूणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो.
वेणू म्हणाली, 'निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?' वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. 'श्यामची आई ! बराच आला आहे हा ताप!' ती खिन्नपणे म्हणाली.
मी म्हटले, 'वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो.'
वेणूने विचारले,