श्यामची आई

'आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी, म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे, भाऊराव!'

परंतु वडील म्हणाले, 'पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!'

घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी

315 of 837