श्यामची आई

त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दु:खी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे. आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.

एके दिवशी भास्कर मला म्हणाला, 'श्याम! आता दहाच श्लोक माझे राहिले. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?'

326 of 837