श्यामची आई

त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले.

'काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?' भीमाताईने विचारिले.

मी म्हटले, 'हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहीतच होतो.'

'वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही.' ती म्हणाली.

मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवडयात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे,

336 of 837