श्यामची आई

रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे काटर्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन् वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस.' आई रागावून दु:खसंतापाने वेडी होऊन बोलत होती.

आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणार्याऐ रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेर्याल घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.

374 of 837