कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणित विशारद रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.
दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळयात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंडयाझुंबरासारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्यांची माहेरघरे आहेत.