मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.
पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मी उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.
गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठया आनंदाने चालत होते. पहाटेची