'आई तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण.' माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून