श्यामची आई

गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. 'येथेच लाल पाणी का बरे?' असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.

ते म्हणाले, 'देवाचा चमत्कार; दुसरे काय?'

आई म्हणाली, 'येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!' सुभाताईचे यजमान म्हणाले, 'हो! तसा तर्क करावयास हरकत नाही.'

620 of 837