हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकून दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणार्याु देवाला भक्त काडवातीने, निरांजनाने ओवाळतो. स्वत:च्या अंत:करणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुध्दी नको का शिकावयाला?
कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली,