श्यामची आई

त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळयांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.

'आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!' असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्या वेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.

640 of 837