वयं यूयं' असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, 'अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया' देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दु:ख बोलतांही समजते. नामदेवाला माझे सुखदु:ख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो.