श्यामची आई

घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात. रसमय, गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळया नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, 'श्याम ! मुक्या कळया नको हो तोडू,

112 of 837