घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला.
मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?'