श्यामची आई

गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसर्यापच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसर्याभची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.

187 of 837