श्यामची आई

माझी आई मधून गोठयात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोर्याे गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून

188 of 837