श्यामची आई

'श्याम! अंग दुखते आहे. जरा चेपतोस का?' आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कढत झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते.

मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. 'येता ना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे.' वेणू गोड वाणीने म्हणाली.

आई उठली. आई तिला म्हणाली, 'जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरल्ये नव्हत्ये. आता येणारच होत्ये. चल.'

आई वेणूकडे गेली व वडया करू लागली. निरनिराळया गोष्टी

265 of 837