जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल.'
वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, 'वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर.'
वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, 'श्यामची आई! माझ्यासाठी हा तुम्हांला त्रास. हा ताप.'
आई म्हणाली, 'वेण्ये, वेडयासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तशीच तू. वडया चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती,