भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती ! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई.
विठोबाला वाहिली फुले । भजन करिती लहान मुले ।
विठोबाला वाहिली माळ । भजन करिती लहान बाळ ॥
वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळया प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू.