श्यामची आई

पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! 'अरे आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळयाला फास लावायचास एखाद्या वेळी!' असे शब्द माझ्या कानी पडले. ते

311 of 837