श्यामची आई

स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणार्यारसमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.

परंतु किती वेळ बसणार?

310 of 837