भास्कर म्हणाला, 'श्यामच्या आई! मी नुसते म्हटले, की आणखी पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो.'
आई माझ्याकडे वळून म्हणाली, 'होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील.'
मी रागातच म्हटले, 'तो मला मुद्दाम हिणवायला येतो. 'तुला कोठे येते रामरक्षा?' असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने