वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षर किरटे होते.
वडील म्हणाले, 'शाबास अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता.'
मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरुन हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल?
जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. 'आई बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो.' असे प्रेमाने म्हटले.