त्या वेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. 'नाही केली, करतो.' मी म्हटले.
'तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची.' ते रागाने बोलले.
आई म्हणाली, 'आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर.'
मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळयांतील पाण्याची देवाला शतअर्ध्ये सुटत होती.