श्यामची आई

आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गावआजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खर्यांकच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला 'येत्ये. तू जा' असे सांगून पाठविले.

आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार?

आई आजीला म्हणाली, 'तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?'

430 of 837