श्यामची आई

'काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणून आलास होय ना?'

मी त्याला म्हटले, 'चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे.'

'कोणाला धोतरजोडा? तुला?' त्याने विचारले.

'नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद हवा. पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो.' असे मी सांगितले.

मोहन्या मारवाडयाने दोन-तीन प्रकारचे धोतरजोडे दिले. अमृतशेट म्हणाले,

445 of 837