आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवयनी आल्या.
'बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, 'आज रात्री एकटया कशा दळीत बसल्यात, म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय? तू इंग्रजी ना शिकतोस?' जानकीवयनी मला म्हणाल्या.
मी आईला विचारले, 'आई ! दळायला हात लावला, म्हणून काय झाले?'
आई म्हणाली, 'श्याम ! अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाराला का कोणी