श्यामची आई

भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरूषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरूषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारीनटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वत: पुरूष अपूर्ण आहे. स्वत: एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री-गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती.'

471 of 837