आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते; तर १०८ लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते, तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते?
नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती मी आईला विचारले, 'या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरविले आहेस? जानकीवयनी १०८ सुपार्याो-ओल्या सुपार्याव घालणार आहेत.'
आई म्हणाली 'बाळ, १०८ पोफळी माझी घालून झाली आहेत. मागे सीताआत्याने पाठविली होती.'