'पण काय लोक हसतील, होय ना? हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे? हसायला सारे, मदत करायला कोणी नाही, देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना?' मी विचारले.
आई म्हणाली, 'श्याम! देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुराघरच्या कण्यासुध्दा आवडल्या; मिटक्या मारमारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अधाशी व उपाशी!