देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला.
कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. पौष्ठिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे, असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा-भाकर खाणार्यार मावळयांनीच केवढा पराक्रम केला! शारीरिक