खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो, तसा तो आत दु:खाने, अपमानाचे जळे; परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दु:ख कधी कोणास सांगत नसे. स्वत:चे दु:ख, स्वत:ची करूण कहाणी दुसर्यांस सांगून त्याला आणखी का दु:ख द्या, असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, 'खरेच, आई, मला एकटयाला खायला लाज वाटते, हो. उद्यापासून मला देऊ नकोस. सार्यांलना देणार असशील, तरच मला दे. देवी बर्याय झाल्या. आता काय? बरणीत आहे, तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ.'