श्यामची आई

त्याच्या तळव्यांची आग होते; मग त्या वेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहात होता; मुकेपणाने मला बोलावीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावयाचे नाहीत, असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला,

517 of 837