शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही.
आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुऊन आली. मी जागचा हाललो नव्हतो, हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, 'गजू! मी देते हो, तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईद पक्के!' असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी-खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी