घासायची होती; परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये, म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई! मोठया मनाची आई! एक शब्दही मला ती बोलली नाही; माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, 'आई! तू जा. मी देतो पाय. आई, हो ना दूर.'
आई म्हणाली, 'द्यायचे असतील. तर नीट हळूहळू दे. धसमुसळयासारखे नको देऊ. त्याला