वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो, तसे कर. सुभद्रेकडे धावत-पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली, तर घेऊन ये. तिने न दिली, तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग.'
नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, 'ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात, कोठे काय पाहिलेस, सांग. तुझे आपले बरे. सारीकडे हिंडतोस. तुला नारदा, कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक,