अभंग, दिंडी, साकी, यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसर्याळ बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंडया लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत.
आम्ही भेंडया लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले 'श्याम, अरे श्याम' अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, 'श्याम! अरे, कोणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे.' इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही.