श्यामची आई

इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांडयाचे फडके सोडले. 'ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू.' असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, 'तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे.'

आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता.

549 of 837